Garbage
sakal
पुणे - उरुळी देवाची येथील कचरा डेपो परिसरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (बीपीसीएल) स्वखर्चाने ३०० टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत दाखल करण्यात आला. हा प्रकल्प केल्याने महापालिकेवर कोणताही आर्थिक भार निर्माण होणार नाही. पण विशेष सभेच्या नावाखाली स्थायीने हा प्रस्ताव अडवून ठेवला आहे. त्यामुळे यातून स्थायी समिती पुणेकरांचे काय हित साधणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.