Devendra Fadnavis | २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या - ब्राह्मण महासंघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis
२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या - ब्राह्मण महासंघ

२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या - ब्राह्मण महासंघ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना याबद्दलचं पत्र देण्यात आलं आहे. ब्राह्मण महासंघ पुण्यात भाजपाच्या मागे ठामपणे उभा राहील, अशी खात्रीही यावेळी देण्यात आली. (Devendra Fadnavis BJP)

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. प्रत्येक वेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे, त्यामुळे २०२४ ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन ब्राह्मण महासंघानं दिलं आहे.

हेही वाचा: मलिकांविरोधात गुन्हा दाखल करताच समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलं आहे. "तुम्ही फडणवीस यांची जी निवड केली आहे ती अतिशय सार्थ असून दिल्लीतलं राजकारणाची फडणवीस यांची सुरुवात पुण्यातून हवी", अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Brahmin Mahasangh Devendra Fadnavis Bjp Mp From Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis