
अँबिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट प्रा. लि.ची स्थापना १७ ऑक्टोबर २००१मध्ये घटस्थापनेच्या दिवशी प्रा. कौस्तुभ अत्रे यांनी केली. प्रा. अत्रे यांना २८ वर्षे शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रचंड कष्ट, विषयाची आवड, शिकवण्याची तळमळ, सर्व शिक्षकांचे सहकार्य आणि कौस्तुभ अत्रे सरांच्या दूरदृष्टीमुळे अँबिशन्स आज पुण्यामध्ये नावारूपाला आले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शिकवण्याची एकच ठरावीक पद्धत वापरून चालत नाही. त्यामध्ये काळाप्रमाणे तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलनाप्रमाणे बदल करावा लागतो या विचार पद्धतीमुळे अतिशय सर्वसाधारण विद्यार्थ्यांपासून ते हुशार विद्यार्थ्यांपर्यंत आज अँबिशन्स नावाजले जाते. अँबिशन्सनी आजपर्यंत अंदाजे ४५ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. आता इथल्याच विद्यार्थ्यांची पुढची पिढीही शिकण्यास येत आहे. अँबिशन्समध्ये नुसता अभ्यास एके अभ्यास चालत नाही, त्या बरोबर सामान्य ज्ञान, जगात कसे वावरावे, एक आदर्श नागरिक कसा असावा याचे धडे व आयुष्यात यशस्वी कसे होता येईल याचे मार्गदर्शनही केले जाते. अँबिशन्सचे घोषवाक्यच आहे आत्ता कष्ट म्हणजे नंतर आराम आणि आत्ता आराम म्हणजे नंतर कष्टच कष्ट. मुलांचा विषयातील रस, आवड व कष्ट आणि अँबिशन्सचे मार्गदर्शन यामुळे गेली चारही वर्षे बारावीत पुणे बोर्डाच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान अँबिशन्सच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. एवढेच नाही तर यावर्षी २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण मिळाले.
अँबिशन्समध्ये विद्यार्थ्यांना CA, CS, BBA, LLB, Hotel Management च्या पूर्वपरीक्षांना तयार करतात. तसेच CA, CS च्या अंतिम परीक्षेपर्यंत अँबिशन्सचे निष्णात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करीत आहेत.
अँबिशन्समध्ये उच्चविद्याविभूषित, अनुभवी व विद्यार्थ्यांच्या कला कलाने घेणारेच सगळे शिक्षक आहेत यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. अँबिशन्समध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परीक्षा, चर्चासत्र, स्नेहसंमेलन, सहली, स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज अँबिशन्सचे बहुतांश विद्यार्थी देशाच्या अनेक भागात व परदेशात कार्यरत आहेत आणि आजही अँबिशन्सशी नाते जोडून आहेत.
Website : www.ambicommerce.com
Our Address : Karve Road : ४०४, Citi Centre,
Opp. Ayurved Ras shala, Near MES Garware College, Karve Road, Pune ४११००४.
Contact no : ९८५०० ८१८२६ / ०२०- ४१२ ०४०६७
Kothrud : T- ५, ३rd floor, Rohan Chambres, Above Sujata Mastani, Kothrud- ४११०२९
Contact no : ९९२१६ ३५९८३ / ९८५०० ८१८२६
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.