गलानी फॅशन्स : शॉपिंगचा सर्वांगसुंदर अनुभव 

Galani Fashions
Galani Fashions

गेली सुमारे सत्तावन्न वर्षे वस्त्रोद्योग क्षेत्रात आणि होलसेल व्यापारात आघाडीवर असलेले गलानी हे पुणेकरांच्या परिचयाचे नाव. सातारा रोडवरील के.के. मार्केट आणि कुमठेकर रोड येथे गलानींची दोन दालने असून त्यापैकी के. के. मार्केट येथील भव्य दालनात कुटुंबातील प्रत्येकासाठी कपड्यांचा स्वतंत्र विभाग आहे, तर कुमठेकर रोडवरील दुकानात फक्त महिलांसाठी कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिलांसाठी थेट विणकरांकडून आणलेल्या साड्यांची अतिशय योग्य दरात विक्री हे गलानींचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याखेरीज पैठणी, ब्रोकेड सिल्क, बेंगलोर बुट्टा सिल्क, दागिना सिल्क, धर्मावरम रुद्र सिल्क असे साड्यांचे विविध प्रकार, डिझायनर घागरा, पार्टी वेअर घागरा, ब्रायडल घागरा असे घागऱ्यांचे विविध प्रकार, ड्रेस मटेरियल आणि नववधूसाठी दरबारी शालू, दागिना शालू, मयूराक्षी शालू इ .शालूंचे नानाविध प्रकारही येथे मिळतात. गलानी फॅशन्समध्ये पुरुषांकरिताही मेन्स सूट्स, मोदी जॅकेट, कॉर्पोरेट ब्लेझर, कुर्ता सेट, जीन्स असे कपड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी  ‘खुशिया बल्क में, आपके बजेट में’ या संकल्पनेवर सुरू केलेल्या ‘गलानी बल्क स्टेशन’ या अनोख्या उपक्रमाला पुणेकर ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. गौरी-गणपतीच्या सणाच्या निमित्ताने गलानी फॅशन्समध्ये नवीन साड्यांचा एकदम फ्रेश स्टॉक उपलब्ध झाला असून, त्यावर ४०% पर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच, बेडशीट्स आणि टॉवेल यांच्या खरेदीसाठी एक खास काउंटर सुरू करण्यात आला असून त्यावरही खास डिस्काउंट ऑफर आहे. याखेरीज दरवर्षीप्रमाणे ‘गलानी मेगा सेल’ही धुमधडाक्यात सुरू आहे.

त्यामुळेच सणासुदीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘गलानी फॅशन्स’ला लवकरात लवकर भेट देऊन शॉपिंगचा सर्वांगसुंदर अनुभव घ्यायलाच हवा.

अधिक माहितीसाठी संपर्क -
गलानी फॅशन्स - कुमठेकर रोड
गलानी फॅशन्स - के.के. मार्केट, 

पुणे - सातारा रोड
९३२५०२३६४१

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com