अधिक मासात पुणेकरांसाठी अमराळे ज्वेलर्सच्या ‘पायल व जोडवी महोत्सव’चा रूपेरी योग!

amrale jwellers.jpg
amrale jwellers.jpg

पुण्यात लक्ष्मी रोड आणि मुळशीमध्ये पिरंगुट येथे सुप्रसिद्ध असलेली व २५ वर्षांची सुवर्णपरंपरा असलेली पेढी म्हणजेच अमराळे ज्वेलर्स. पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि सर्वांत महत्त्वाते म्हणजे हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांसाठी ही पेढी प्रसिद्ध आहे. सोन्याचांदीचे चोख अलंकार ग्राहकांना देतानाच विविध आकर्षक ऑफर्स देणारी पेढी म्हणूनदेखील अमराळे ज्वेलर्स लोकप्रिय आहेत. अमराळे ज्वेलर्समध्ये दरवर्षी साजरा होणारा ‘चांदी महोत्सव’ या वर्षी देखील आयोजित करण्यात आलेला आहे. या चांदी महोत्सवात खरेदी करण्यासाठी ग्राहक खूप लांबून आवर्जून येत असतात.

यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्ष असून या वर्षी अधिक मासाचे विशेष औचित्य लाभले आहे. अधिक मासामध्ये चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अमराळे ज्वेलर्सने ‘पायल व जोडवी महोत्सव’ही आयोजित केला आहे. पायल व जोडवी घेणाऱ्यांसाठी फक्त ५ रू प्रति ग्रॅम मजुरी आकारण्यात येणार आहे. १० ग्रॅमपासून ३५० ग्रॅमपर्यंत वजनाच्या पायलच्या विविध व्हरायटीज् अमराळे ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत. अगदी सातशे रुपयांपासून ते पस्तीस हजारांपर्यंतची सुंदर पायल तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जोडवीही अगदी २०० रुपयांपासून पुढील किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अमराळे ज्वेलर्समध्ये पायल व जोडवीचा तुमच्या निवडीसाठी मोठा स्टॉक असणार आहे. 
या महोत्सवासाठी असंख्य डिझाइन्सचा जणू खजिनाच खुला करण्यात आलेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठीही चांदीचे ताट, तबक, समई, दिवा व इतर अनेक भेटवस्तू उपलब्ध आहेत. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याकाळात चांदीची खरेदी करणाऱ्यांना पुढील काळातील सोन्याच्या खरेदीच्या घडणावळीवर १०% सूट, तसेच चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% सूट देण्यात येणार आहे तसेच १ ग्रॅम सोने खरेदी करणाऱ्यांसाठी २५% सूटही देण्यात येणार आहे, त्यासाठीचे डिस्काउंट कुपन मिळेल. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण सुरक्षिततेची काळजी देखील घेण्यात आलेली आहे. तसेच, पुणे शहरातील ग्राहकांना होम डिलिव्हरीचाही पर्याय अमराळे ज्वेलर्सतर्फे देण्यात आलेला आहे. अमराळे ज्वेलर्सचे फडतरे चौक शोरूम, लक्ष्मी रोड शोरूम व पिरंगुट शोरूममध्ये या महोत्सवाचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा, असे आवाहन अमराळे ज्वेलर्सचे संचालक श्री. स्वप्निल बाळासाहेब अमराळे यांनी केले आहे.

अमराळे ज्वेलर्स, लक्ष्मी रोड. संपर्क ः 020-24453297, पिरंगुट ः 9504588999

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com