क्लिन अँड ग्रीन : महिला शक्तीचे पुण्यात ‘क्‍लीन अँड ग्रीन’ अभियान!

clean and green.jpg
clean and green.jpg

वैशिष्ट्ये : क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेस या पुण्यातील अग्रगण्य पेस्टकंट्रोल कंपनीच्या कार्यामागे स्त्रीशक्ती आहे. सन २००० साली सौ. आसावरी डोळे आणि सौ. सोनाली नगरकर या दोन महिला युवा उद्योजिकांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. उत्कृष्ट दर्जा आणि वेळेची शिस्त यामुळे या कंपनीने अल्पावधीतच पुणेकरांचा विश्‍वास संपादन केला. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या काळाप्रमाणे घातक रसायनांचा वापर न करता, हर्बल केमिकल्सचा वापर, ऑपरेटर्सना ट्रेनिंग आणि आधुनिक कार्यशैली. या वैशिष्ट्यांमुळेच क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेस ही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी ठरते. सरकारी लायसन्स, विश्‍वासू ऑपरेटर्स आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे कंपनीचा कार्यविस्तार दरवर्षी वाढत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उल्लेखनीय : पेस्ट कंट्रोल कंपनी पूर्णपणे महिलांनी चालवणे ही एक दुर्मिळ घटना आहे. क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेस ही घरगुती पेस्ट कंट्रोल व्यतिरिक्त प्री कन्स्ट्रक्‍शन पेस्ट कंट्रोलमध्ये सुद्धा एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या २० वर्षांच्या अनुभवातून क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेसने पुणेकरांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे. तसेच सर्व ऑपरेटर्स व ऑफिस स्टाफ हे कुटुंब म्हणून एकत्र बांधले गेले आहेत.
सौ. आसावरी डोळे यांच्या मते कंपनी वाढण्यामागे ‘ही कंपनी माझी आहे’ ही भावना इथल्या प्रत्येकामध्ये आहे. क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेस यांची कराड येथेसुद्धा शाखा असून तेथील ग्राहकवर्गाचा सुद्धा विश्‍वास त्यांनी संपादन केला आहे.

भविष्यातील योजना : कंपनीच्या भविष्यातील योजनांबद्दल सोनाली नगरकर म्हणतात की ऑपरेटर्स हे कंपनीचा चेहरा असतात. कंपनीची जी प्रतिमा तयार होते किंवा ग्राहकांना जो विश्‍वास वाटतो त्यात ऑपरेटर्स हे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे आमचे ऑपरेटर्स हे व्यवस्थित युनिफॉर्ममध्ये, गळ्यात आयडी कार्ड असलेले, प्रशिक्षित आणि विश्‍वासू असतात. यासर्व अनुभवावरून येत्या वर्षभरात क्‍लीन अँड ग्रीन सर्व्हिसेस आता चक्क थायलंड येथे शाखा चालू करायच्या तयारीत आहे. आता कोरोनावर उपाय म्हणून घर, ऑफिस, फॅक्‍टरी आणि कार सॅनिटायझेशनची कामेसुद्धा पूर्ण जबाबदारीने आणि पूर्ण काळजीपूर्वक केली जातात. आसावरी डोळेंच्या मते एकदा ग्राहक जोडला गेला की, तो कंपनीच्या परिवाराचा भाग असतो. त्यामुळे हा परिवार दरवर्षी वाढतच आहे. सोनाली नगरकरांच्या मते महिलांनी पुढे येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्न केले तर यश नक्की मिळते. आता सरकारसुद्धा महिला सबलीकरणावर भर देत आहे. त्यामुळेच कंपनी सुद्धा आता महिला पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स तयार करण्यावर भर देणार आहे. पुणेकरांची प्रथम पसंती असलेली पेस्ट कंट्रोल कंपनी हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याकरता आसावरी डोळे आणि सोनाली नगरकर नवीन विचारांनी व नवीन पद्धतीने प्रयत्न करत आहेत.

Clean & Green Services
Contact : ९३२६२३१९५६ / ९३२६१२९२६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com