फ्लोरपिकर कंपनी : आता दळणही ‘ऑनलाइन’ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

आजच्या धावपळीच्या जीवनात ई.-कॉमर्समुळे
जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळाल्यास नागरिकांची सोय होते व त्यांच्या वेळेची बचतही होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात ई.-कॉमर्समुळे
जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळाल्यास नागरिकांची सोय होते व त्यांच्या वेळेची बचतही होते. सगळ्याच गोष्टी ऑनलाइन मिळतात मग दळण मिळाले तर? आटा चक्कीवर जा, थांबा हा.. हा त्रासच नको. पण ‘दळण’ ऑनलाइन मिळण्याची काही सोय नसल्याने गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, बॅचलर्स यांच्याकडे उत्तम पर्याय नव्हता. पण आता आपल्या दैनंदिन वापरातील गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिठे सगळ्यांना विनासायास, सहजपणे घरपोच मिळावीत, ती पण ताजी व दळल्या दिवशीच! यासाठीच फ्लोरपिकर इन्फोटेक कंपनी आपल्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

सध्या जगभरात असलेल्या महामारीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तू नागरिकांना घरपोच मिळाल्यास करोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे विचारात घेऊन घरपोच, ताजे पिठ ऑनलाइन मिळण्याची सुविधा फ्लोरपिकरने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप व संकेतस्थळ विकसित केलं आहे. फक्त त्यांच्या अॅपवर जायचे आणि आपल्याला हवे ते पिठ ऑर्डर करायचे. फक्त धान्य नव्हेतर आपल्या आवडीनुसार मिश्र पिठ आपल्याला हव्या त्या प्रमाणात एकत्र करुन घरपोच मिळेल.. ते ही ताजे! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संकल्प : सध्याच्या करोना आणि सोशल डिस्टंसिंगच्या धोरणास पूरक अशी ग्राहकाभिमुख सेवा हेच कंपनीचे उद्दीष्ट आहे. आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करूनच सेवा देण्याचा फ्लोअरपिकरचा संकल्प आहे असे कंपनीचे संस्थापक कृष्णा पवार यांनी सांगितले.

      आमची वैशिष्ट्ये...

  •  ग्राहकांना उत्तम प्रतीचे व स्वच्छ धान्य  निवडण्याची सोय.
  •  ग्राहकांनी दिलेल्या वेळेनुसार घरपोच  डिलिव्हरीची सोय. 
  •  आपल्या डायटनुसार धान्य निवडून स्वतःची रेसिपी तयार करण्याची विशेष सोय. 
  •  कंपनीकडून काही विशिष्ट मल्टीग्रेन रोटी व भाकरीपीठांची सोय अशी फ्लोरपिकरची वैशिष्ट्ये आहेत. 

या अत्यंत उपयुक्त सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी फ्लोरपिकर अॅप डाऊनलोड करावे तसेच अधिक माहितीसाठी https://flourpicker.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.

उल्लेखनीय 

फ्लोरपिकरमध्ये परवा लंडन, यु.के. वरुन कॉल आला होता. फ्लोरपिकर विषयी त्यांना तिथे कळल्यानंतर त्यांच्या वाकडमधील कुटुंबासाठी त्यांनी ऑडर दिली. पिठाची व सेवेची गुणवत्ता पाहून सोसायटीमधील इतर सदस्यांना फ्लोरपिकर कडून पिठे घेण्यास सुचवू असे ते म्हणाले. तसेच पिठात ५% घट येते म्हणजे काय असा त्यांचा प्रश्‍न होता. दळणाच्या प्रक्रियेत अशी घट येते हे पटवल्यानंतर त्यांचे समाधान झाले. 
या नव्या उपक्रमाची दखल परदेशातही घेतली गेली व त्यांच्या शंकाही दूर करता आल्या याचे समाधान वाटते. ग्राहकांच्या अशा व इतर अनेक प्रकारे मिळणाऱ्या प्रतिसादामुळे फ्लोरपिकरची उमेद वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांचाही प्रतिसाद उत्तम आहे. सगळ्यांकडून येणाऱ्या सुचनांमुळे अधिक  उत्तम सेवा देता येईल असा फ्लोरपिकर टीमला विश्‍वास वाटतो.    

श्री. कृष्णा विठ्ठल पवार
७३८७७८५३६९, ९८२३४८८९६५
रावेत, पुणे : ४११०४४ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about flourpicker company