esakal | मनोहर सुगंधी आणि कंपनी : दैनंदिन जीवन सुगंधी करणारे
sakal

बोलून बातमी शोधा

Manohar-Sugandhi

मनोहर सुगंधी आणि कंपनी गेल्या ७५ वर्षांहून अधिक काळ सुगंधी व धार्मिक उत्पादनांची निर्मिती व संशोधनाशी निगडित संस्था आहे. कै. हरिभाऊ गानू  यांनी १९३०च्या सुमारास स्थापन केलेल्या या संस्थेच्या सुरवातीच्या काळात पारंपारिक पद्धतीने उद, धूप, गुगुळ, चंदन, आगर, कस्तुरी व काही मसाले वापरून अगदी कमी प्रमाणात उदबत्ती उत्पादन केले जात असे.

मनोहर सुगंधी आणि कंपनी : दैनंदिन जीवन सुगंधी करणारे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मनोहर सुगंधी आणि कंपनी गेल्या ७५ वर्षांहून अधिक काळ सुगंधी व धार्मिक उत्पादनांची निर्मिती व संशोधनाशी निगडित संस्था आहे. कै. हरिभाऊ गानू  यांनी १९३०च्या सुमारास स्थापन केलेल्या या संस्थेच्या सुरवातीच्या काळात पारंपारिक पद्धतीने उद, धूप, गुगुळ, चंदन, आगर, कस्तुरी व काही मसाले वापरून अगदी कमी प्रमाणात उदबत्ती उत्पादन केले जात असे. पुढे कै. मनोहर गानू यांनी अधिक संशोधन करून तयार केलेल्या धूप व अगरबत्त्यांना संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही विशेष लोकप्रियता मिळाली. मनोहर हे नाव सुगंधी व दर्जेदार पूजा साहित्यासाठी विशेष लोकप्रिय आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यात अष्टगंध, अगरबत्ती, धूप, धूप कप्स, वाती तसेच पारंपारिक व नावीन्यपूर्णण अत्तरांचा समावेश आहे. नवीन उत्पादनांपैकी पानडी, बकुळ, सॅंडल फ्लॉवर तसेच रोजवूड अशा अगरबत्ती व धूपातील सुगंधांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे.

या वर्षीही नावीन्यपूर्ण उत्पादनांची परंपरा कायम राखत मनोहर सुगंधीने वातावरण प्रसन्न करणाऱ्या ‘तुलसी शक्ती’ व ‘होम हवन’ आणि त्याचबरोबर अस्सल केशर अत्तराची ‘ केसरी’ या सुगंधी अगरबत्त्या सादर केल्या आहेत.

ही सर्व मनोहर उत्पादने संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर वितरित होतात. आता आपण फेसबुक तसेच इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे मनोहर सुगंधीशी जोडले जाऊ शकता आणि नवीन उत्पादनांविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता. याशिवाय ‘अमेझॉन’सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे मनोहर उत्पादनांचा लाभ घरपोच घेऊ शकता. विविध धार्मिक आणि पूजाविधीकरिता लागणाऱ्या या उत्पादनांच्या संशोधन व निर्मितीचे कार्य करणाऱ्या मनोहर सुगंधीचे सध्याचे मालक श्रीकांत मनोहर गानू यांच्या सोबत गानू कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत असून, त्यांचे बंधू प्रसाद गानू व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे त्यांना उत्तम सहकार्य लाभत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-२४४५२३५४

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image