NMVPM
NMVPM

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ : कौशल्याधिष्ठित व्यावसायिक करिअरच्या संधी

लोकमान्य टिळकांनी १९०६ मध्ये तळेगाव दाभाडे येथे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. मागील ११४ वर्षे अहर्निशपणे विद्यादान करणाऱ्या या संस्थेमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा आहेत. माजी आमदार कृष्णराव भेगडे या संस्थेचे अध्यक्ष असून कै. अण्णासाहेब विजापूरकर यांनी संस्कारित केलेल्या शिक्षण विचारांचा विस्तार विद्यार्थ्यांसाठी सातत्याने केला जात आहे. संजय बाळा भेगडे - उपाध्यक्ष, सुरेशभाई शहा- खजिनदार, संतोष खांडगे- सचिव, नंदकुमार शेलार- सहसचिव तर राजेश म्हस्के - कार्यकारी समिती चेअरमन आहेत. नूतन महाराष्ट्र संस्थेचा २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या सुप्रसिद्ध संस्थेसोबत प्रशासकीय कामकाज, प्लेसमेंट सुविधा आदींसाठी सहकार्य करार झालेला असून डॉ. गिरीश देसाई कार्यकारी संचालक आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संस्थेची अभियांत्रिकी महाविद्यालये - पुणे विद्यापीठाअंतर्गत बी. ई. ची पदवी देणाऱ्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी) मध्ये संगणक, आय. टी, मेकॅनिकल आणि ई अँड टी. सी. या शाखा आहेत. तर बाटु विद्यापीठांतर्गत बी. टेक ची पदवी देणाऱ्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च (एनसीईआर) मध्ये मेकॅनिकल, कॉम्प्युटर, ई अँड टीसी तसेच ऑटोमोबाईल शाखा आहेत.

‘बी. व्होकेशनल’ची कौशल्याधिष्ठित पदवी - कौशल्यविकसनावर आधारित बी. व्होक पदवीचे शिक्षण सायन्स, कॉंमर्स, आर्टस शाखांतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. Software Development, ग्राफिक्‍स - मल्टीमिडीया, इलेक्‍ट्रॉनिक मॅन्युफॅंक्‍चरिंग, इंडस्ट्रिअल टूल, रेफ्रिजरेशन- एअर कंडीशनिंग, ऑटोमोबाईल ही स्पेशलायझेशन्स येथे उपलब्ध आहेत.

संस्थेची वैशिष्ट्ये

  • १६० हून अभियांत्रिकी आस्थापनांशी करार.
  • NAAC प्रमाणित.
  • Industry Institute Interaction कामाचे राष्ट्रीय पुरस्कार
  • परदेशी भाषा (जापनीज, जर्मन) यांचे प्रशिक्षण
  • महिंद्रा अँड महिंद्रा, टिव्हीएस आदी आस्थापनांचे प्रशिक्षण केंद्र
  • इंटर्नशिपची संधी

कॅम्पस प्लेसमेंट - पिंपरी चिंचवड एज्यकेशन ट्रस्ट च्या सेंट्रल प्लेसमेंट सेल मार्फत या वर्षी १४० हून अधिक विद्यार्थ्यांना कॅपजेमिनी, इन्फोसिस. आयबीएम, अमेझॉन, क्वांटिफाय, पर्सिस्टंट, टिसीएस, बिर्लासॉफ्ट आदी अनेक नामांकित कंपनींद्वारे चांगल्या पॅकेजची संधी सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.

संपर्क : ७४२४ ०८०९१०, ९८५०९०७८८०, 
९२७०२५२२७७, ९५५२७३७७३१
www.nmiet.edu.in
www.ncerpune.in

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com