साई स्नेह हॉस्पिटल : आपुलकीचा डोस देणारे ‘साई स्नेह’

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

साई स्नेह हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रातील खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती १५ ऑगस्ट १९८५ या दिवशी. सुरुवातीला साडेपाच वर्ष खरवंडी (ता. नेवासा, जि. नगर) सारख्या खेड्यामध्ये प्रॅक्टिस करून नंतर १९९१मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कात्रजमध्ये ओपीडी व चार खाटांचे हॉस्पिटलची सुरुवात केली.

साई स्नेह हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रातील खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती १५ ऑगस्ट १९८५ या दिवशी. सुरुवातीला साडेपाच वर्ष खरवंडी (ता. नेवासा, जि. नगर) सारख्या खेड्यामध्ये प्रॅक्टिस करून नंतर १९९१मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कात्रजमध्ये ओपीडी व चार खाटांचे हॉस्पिटलची सुरुवात केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कालांतराने कात्रज व त्या परिसरातील लोकांना वैद्यकीय क्षेत्राची काय गरज आहे ते ओळखून डॉ. सुनिल जगताप यांनी फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिसची सुरुवात केली. नंतर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर तसेच पॅथालॅाजी लॅब तसेच एक्स-रे ची सुविधा व या भागातील लोकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी सर्व प्रकारच्या डॉक्टरांना बोलावून ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर दोनच वर्षांने चार खांटाचे आठ खांटामध्ये हॉस्पिटल वाढवण्यात आले. पहिल्यापासूनच २४ तास बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात आले. मनापासून रुग्णांची केलेली सेवा व सामाजिक काम करत असताना हॉस्पिटलची जागा कमी पडत होती हे लक्षात आल्यानंतर शेजारीच जागा घेऊन सर्व सोयींनी अद्ययावत असे हॉस्पिटल १९९९मध्ये सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने आयसीयुची सुविधा करण्यात आली. तसेच अपघातग्रस्त लोकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली. या सेवेसाठी सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात. त्याचबरोबर २०१८ पासून डॉ. सुनिल जगताप यांचे मोठे चिरंजीव डॉ. सुमित (एम.डी. मेडिसिन) ‘साई स्नेह’च्या परिवारामध्ये दाखल झाले.

त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी या जुलै २०२०पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ‘साई स्नेह’च्या परिवारामध्ये दाखल झाल्या आहेत. अशा पद्धतीने साई स्नेह परिवाराच्या वतीने वैद्यकीय सेवेचा पुढील पिढीकडून रुग्णांना सेवा देण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. 

डॉ. सुमित जगताप हे डायबेटालॉजिस्ट म्हणून प्रामुख्याने काम करत आहेत. त्याचबरोबर पॅरालिसिस, थायरॉईड, ब्लडप्रेशर या आजारांवर त्यांचे विशेष उल्लेखनीय काम चालू आहे. तसेच नसरापूर येथे जाऊन कोरोनाच्या रुग्णांना विशेष उपचार व मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. पल्लवी जगताप यांनी स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भातील वंध्यत्व व प्रसूती या विषयी कामकाजास सुरुवात केली आहे. व गरोदरपणामध्ये स्त्रीयांनी कोरोनाच्या काळात काय काळजी घ्यावी याविषयी विशेष  मार्गदर्शन करत आहेत. ‘साई स्नेह’ हॉस्पिटलच्या वतीने दादा जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबविले जातात.

यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात व कात्रज परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी डायलेसिस सेंटर चालविण्यात येते. तसेच वेगवेगळी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. गेल्या ३६ वर्षाच्या वैद्यकिय क्षेत्रातील अनुभव व रुग्ण व डॉक्टर याच्यामधील असलेले एक विश्वासाचे नाते द्रुढ झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांना कोणतीही अडचण येत नाही व सर्व हॉस्पिटलचे कर्मचारी व हॉस्पिटलचे रुग्ण हे एका कुटुंबाप्रमाणे काम करत असतात.
Sai Sneh Hospital, Opp Pmt Bus Depot, katraj, pune 410046, 
contact number - 
8888150101, 02026959209
mail to : Email-saisneh@gmail.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Sai Sneh Hospital