
घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. यासोबतच घरातल्या प्रत्येकासाठी घरात एक हळवा कोपरा असतो. आपल्या स्वप्नातलं घर अधिक सुंदर बनविण्यासाठी सोलवूड व्हेंचर्स हे पुण्यातील सर्वांत मोठे पाच मजली भव्य शोरूम आपल्याला अनेक नयनरम्य तसेच दर्जेदार सॉलिड वूड म्हणजेच अस्सल लाकडी फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देते. सोफसेट्स, बेड्स, डायनिंग टेबल, टी पॉय, आराम खुर्च्या, ड्रेसिंग टेबल्स, वोर्डरोब अशा अनेक मनमोहक वस्तूंची विस्तृत श्रेणी सोलवूडमध्ये पाहावयास मिळते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लाकडी फर्निचरसाठी वेगळी ओळख असलेल्या काजवे फर्निचरचे सोलवूड व्हेंचर्स हे एकमेव वितरक आहेत जे इनडोअर फर्निचरसाठी नावाजले जाते. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे अस्सल सॉलिडवूड, फोम, असंख्य प्रकारचे कापड आणि जागतिक दर्जाच्या मशीन्सवर तयार केलेल्या या प्रॉडक्ट्सचा दर्जा आणि गुणवत्ता पाहताच नजरेत भरतो. एकाच छताखाली एवढी विस्तृत श्रेणी कुठेच पाहावयास मिळत नसल्याचे ग्राहक आवर्जून सांगतात. आउटडोअर फर्निचरसाठी जगभरात नावाजलेल्या नार्डी या इटालियन ब्रँड्सची अतिशय दर्जेदार उत्पादने सोलवूडमध्ये आपल्याला मोहित करतात.
पूर्वी एका नामांकित कंपनीत इंजिनिअर असलेले श्री. किशोर जाधव, कमर्शिअल आर्टिस्ट असलेले श्री. सुनील कोकाटे तसेच स्वतः इंटेरिअरमध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले श्री. मंगेश हांडे हे सोलवूडचे प्रवर्तक आहेत.
ग्राहकांना केवळ अस्सल लाकडी आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देताना असंख्य डिझाईनचे पर्याय ही सोलवूडची खासियत असल्याचे श्री किशोर जाधव सांगतात. फक्त २ वर्षांपूर्वी सुरू केलेले हे ५ मजली भव्य शोरूम पाहताना भान हरपून जाते. ग्राहकांना केंद्रभागी ठेवून त्यांच्या निवडींना असंख्य पर्याय उपलब्ध असल्याचे श्री कोकाटे सांगतात.
इंटेरिअरसाठी श्री. हांडे मोलाचं मार्गदर्शन करतात. आकर्षक रंगसंगती, अनोखी डिझाइन्स, आणि टिकाऊपणा यामुळे सोलवूडला नेहमीच ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे दर्जा आणि गुणवत्ता असामान्य असल्यामुळे सध्याच्या ग्राहकांकडूनच इतर ग्राहकांना आणि परिचितांना सोलवूड रेफर केले जाते असे सोलवूडचे प्रवर्तक सांगतात. शुभारंभापासूनच सोलवूडला इंटेरिअर डिझाइनर आणि आर्किटेक्ट्स आवर्जून आणि सतत भेट देतात. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि दर्जेदार फर्निचरचा विचार करता भविष्यात सोलवूड व्हेंचर्स फर्निचर विश्वात आपला सखोल ठसा उमटवणार यात शंका नाही. चला तर मग घर सजवताना एकदा सोलवूडला अवश्य भेट द्यायलाच हवी.
Address : Tiny Industrial Co-Op Estate Ltd, Plot No
3 & 4, Kondhwa - Pisoli Road, Near Khadi Machine Chowk, Kondhwa, Pune - 411048
Website : www.soulwoodventures.com
Contact Nos : 9881729056 / 7020083580
SAKAL READER CONNECT INITIATIVE
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.