वाघण्णा क्लिनीक : मेंदू विकार आणि उपचार- एक नवा दृष्टिकोन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

मेंदू विकार असणाऱ्या रुग्णांना एके दिवशी सांगितलं जातं की, आता रुग्णावरचे उपचार थांबवा यांचा आजार वाढतच जाईल. आयुष्यभर औषधांशिवाय पर्याय नाही, तुमचं मूल असंच विकलांग जगणार... कल्पना करा, अशी निराशा पदरी पडलेल्या माता-पित्यांचं अंतःकरण किती पिळवटून निघत असेल. परंतु अशा पीडितांसाठी खंबीर आधार ठरले आहेत - डॉ. सूर्यकिरण वाघण्णा.

मेंदू विकार असणाऱ्या रुग्णांना एके दिवशी सांगितलं जातं की, आता रुग्णावरचे उपचार थांबवा यांचा आजार वाढतच जाईल. आयुष्यभर औषधांशिवाय पर्याय नाही, तुमचं मूल असंच विकलांग जगणार... कल्पना करा, अशी निराशा पदरी पडलेल्या माता-पित्यांचं अंतःकरण किती पिळवटून निघत असेल. परंतु अशा पीडितांसाठी खंबीर आधार ठरले आहेत - डॉ. सूर्यकिरण वाघण्णा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, अतिचंचलता, पार्किन्सन्स यांसारखे मेंदूविकार असलेली बालकं, व्यक्ती यांचं एक निराळंच जग आहे. त्या जगातली दुःख, सहनशीलता याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाच नाही. त्यामुळे अशा नागरिकांच्या समस्यांना कुठल्याही राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत स्थान मिळत नाही, अशा गंभीर आजारांनी पीडित रुग्णांचे नातेवाईक अ‍ॅलोपॅथीतील महागडे उपचार घेत मेटाकुटीला येतात. यावर वाघण्णा क्लिनिक हा आशेचा किरण आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाघण्णा क्लिनिकची मुहूर्तमेढ डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांचे वडील वैद्य मल्लिकार्जुन वाघण्णा यांनी १९७६मध्ये रोवली. पुढे १९९२मध्ये डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी वडिलांच्या रुग्णसेवेत स्वतःला जोडून घेतले. आतापर्यंत वाघण्णा क्लिनिक हे पोलिओ रुग्णासाठी एक आधारवड होते. साधारणतः १९९५च्या आसपास सुदैवाने आरोग्य विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे पोलिओचे रुग्ण कमी होत चालले होते; परंतु सामाजिक आरोग्याकडे शास्त्रीय नजरेने पाहणाऱ्या डॉ. सूर्यकिरण यांना सेरेब्रल पाल्सीचे रुग्ण वाढत आहेत हे लक्षात आले. तसेच १९९८ ते २००० नंतरच्या काळात अतिचंचलता (ADHD), स्वमग्नता (Autism) डाऊन सिंड्रोम यांसारख्या दुर्धर आजारांच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ होत चालली होती. हे आजार का वाढत आहे. याचा पद्धतशीर अभ्यास डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी सुरू केला असता कंपवात (पार्किन्सन), मिरगी, मंदबुद्धी, वेस्ट सिंड्रोम, वयोमानानुसार मेंदूची झीज होणे यांसारखे अनेक मेंदू विकार वाढत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले, त्यावर पर्यायी उपचार शोधण्याची गरज भासत होती.

अशा आजारांवर शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडून जवळपास उपचार मिळतच नाहीत, मग सर्वसामान्य रुग्णांना, त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडायचं का? हा प्रश्‍न त्यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारला. डॉ. सूर्यकिरण वाघण्णांनी विविधपॅथी, विशिष्ट आहार पद्धती व मानसशास्त्रीय उपचार प्रणालीचा सांधा जोडला. त्यातून वरील दुर्धर आजारांवर एक निराळीच पर्यायी उपचार पद्धती विकसित केली.

आपापल्या क्षेत्रात संशोधकीय दृष्टी असलेले सहकारीच डॉक्टरांनी वाघण्णा क्लिनिकमध्ये सोबतीला घेतले. आव्हान सोपं नव्हतं. मेंदूविकारावर दीर्घकालीन उपचारांची गरज असते. व्यायाम, आहार, औषधोपचार, मसाज, समुपदेशन अशा विविध संयुक्त उपचारातून रुग्ण बरे होऊ लागतात. वाघण्णा क्लिनिकमध्ये रुग्णांना औषधोपचारासोबत विशिष्ट आहारपद्धती दिली जाते. त्यांना असा जीवनसत्त्वयुक्त आहार दिला जातो की, ज्यामुळे रुग्णांच्या मेंदूतल्या पेशींमधील जैवरसायनांमध्ये वाढ होते. परिणामी स्मरणशक्ती, आकलनशक्ती भावना, विचार यांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागतात.
वाघण्णा क्लिनिकची ठाणे येथे एक शाखा असून, अन्य शाखा पुणे व जळगाव येथे आहेत. भारतात मानसोपचारांची केवळ ४३ सरकारी दवाखाने आहेत.

महाराष्ट्रात तर केवळ चार प्रमुख सरकारी मनोरुग्णालयातून रुग्णांना निवासी वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या सेवांमध्ये पर्यायी उपचार प्रणालींचा अंतर्भावच केला जात नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांच्या कार्याचे महत्त्व अधिकच झळाळून येतं. मेंदूविकार झाला की व्यक्ती समाज बहिष्कृत होते, अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबासाठी ‘वाघण्णा क्लिनिक’चे डॉ. वाघण्णा खराखुरा आधार ठरत आहेत.

डॉ. सूर्यकिरण वाघण्णा
मो. नं. ९८२२०९२७२४, २४२६१३३२ 
आकृती चेंबर्स ३ रा मजला लक्ष्मीनारायण टॉकिज चौक स्वारगेट पुणे ३७.
डॉ सूर्यकिरण वाघण्णा हे दर शनिवारी पुणे येथे उपलब्ध असतील.
www.homeoguru.com
E-mail :
smw@waghanna.com

Sakal Reader connect initiative 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Waghanna Clinic