
शिवाजीनगर : मॅाडेल कॅालनी परिसरात एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या शेर बहादूर बिस्ता (मूळ नेपाळ) यांचा, अवघा सत वर्षाचा मुलगा नरेंद्र आपल्या बालमित्रासोबत मॅाडेल कॅालनीतील महापालिकेच्या 'चित्तरंजन वाटिका' उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. उद्यानात आलेल्या भटक्या (श्वान) कुत्र्याच्या डोक्यावरून तो प्रेमाणे, मायेने हात फिरवत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून, गालाला चावा घेतला. पंधरा ते वीस फूट फरफटत नेले. नरेंद्रच्या मित्राने कुत्र्याला दगड मारल्याने सुदैवाने त्याची सुटका झाली मात्र, कुत्र्याने मुलाचा जबडा फाडल्याने मोठी जखम झाली होती. तत्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले परंतू गालाची शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते.