Pune Accident : डंपर चालकाची जागरूकता; मोठा अपघात टळला; कोथरूड येथील घटना
Accident News : कोथरूड येथे एका डंपर चालकाला अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून डंपर रस्त्याच्या कडेला लावला. काही क्षणांतच ते बेशुद्ध होऊन मृत्यूमुखी पडले.
कोथरूड : चालकाला डंपर चालवत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अपघात होणार याची जाणीव होताच त्यांनी प्रसंगावधान राखून डंपर सावधपणे रस्त्याच्या कडेला लावला. मात्र, डंपर थांबविल्यानंतर ते बेशुद्ध झाले आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली.