पुणे - इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असलेल्या चिमुकलीचे प्राण अग्निशामक दलाच्या जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले. जवान योगेश चव्हाण यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी परिसरात घडली.