esakal | तुळजाभवानी मातेची शेकडो वर्षांची 'ही' परंपरा झाली यंदा खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

palng.jpg

कुलस्वामी तुळजापूरमध्ये  भवानी माते साठी जो पलंग जातो तो घोडेगाव (ता.आंबेगाव)  येथील श्री शनिमंदिरात तयार केला जातो. या पंलगाचे वास्तव्य  दहा दिवस असते. पलंग तुळजापूरला पाठविण्याची परंपरा यादव काळापासूनची आहे.

तुळजाभवानी मातेची शेकडो वर्षांची 'ही' परंपरा झाली यंदा खंडित

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : कुलस्वामी तुळजापूरमध्ये  भवानी माते साठी जो पलंग जातो तो घोडेगाव (ता.आंबेगाव)  येथील श्री शनिमंदिरात तयार केला जातो. या पंलगाचे वास्तव्य  दहा दिवस असते. पलंग तुळजापूरला पाठविण्याची परंपरा यादव काळापासूनची आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा रद्द झाल्याने मागील शेकडो वर्षांची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुळजाभवानी मातेच्या जयघोषात पलंगाचा पायी प्रवास  जुन्नर, कुमशेत, नगर मार्गे केला जातो. हा पलंग श्रावण वद्य सप्तमीपासून भाद्रपद शुध्द पंचमीपर्यंत घोडेगाव येथे मुक्कामी असतो. या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाद्रपद शुध्द पंचमीला घोडेगाव येथे पलंगाची मोठी मिरवणूक काढतात. नंतर तोच पलंग निमदरी, जुन्नर, कुमशेत, नारायणगाव, पारनेर, अळकुटी, नगर, जामखेड, भूम आलमार्गे विजयादशमीच्या दिवशी तुळजापूरमध्ये दाखल होतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुळजापूर येथे पलंगाची मिरवणूक व सिमोल्लंघनानंतर पलंगाच्या प्रवेशानंतर त्या ठिकाणी तुळजाभवानीची स्वयंभू मुर्ती पलंगावर विराजमान केली जाते. पलंगाची परंपरा जोपासण्याचे कार्य व या पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावच्या तिळवण तेली समाजास आहे. तर पलंग तुळजापूरला नेण्याचे मानकरी अहमदनगर येथील पलंगे परिवाराकडे आहे. देवीचा पलंगाच्या लाकडावर कोरीव काम ठाकूर कुटुंब करत आहे. तर पलंगाचे सुटे भाग जोडण्याचा मान घोडेगाव येथील भागवत कुटुंबाकडे आहे.
 

loading image
go to top