शिवणे परिसरात स्तनपानाबाबत जनजागृती

शिवणे परिसरात 
स्तनपानाबाबत जनजागृती
Published on

शिवणे, ता. ७ : ‘आईचे दूधच बाळाचे पहिले संरक्षण कवच’ ठरत असून, स्तनपानामुळे बाळाची प्रतिकारशक्ती भक्कम होऊन सर्वांगीण विकासाला मदत होते‌, अशी माहिती ग्रोस्कॉफ फॅमिली क्लिनिकच्या न्यू अहिरे गाव (शिवणे) येथील कार्यक्रमात देण्यात आली‌.
स्तनपान सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली‌‌. गोरॉन ग्रोस्कॉफ फॅमिली क्लिनिकच्या माध्यमातून ‘फॅमिली प्लॅनिंग’ व मातृ-शिशु आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन न्यू अहिरे गाव (शिवणे) येथील अंगणवाडी क्र. १३१ व १३२ मध्ये केले होते. क्लिनिकच्या आरोग्यसेविका ज्योती देशकर व समन्वयक रूपाली जाधव यांनी दिली. या कार्यक्रमात महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सुमारे ३७ महिलांनी उपस्थित राहून स्तनपानाच्या महत्त्वाबाबत माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्योती शिंदे, सुगंधा पवार, स्वाती पवार तसेच मदतनीस संध्या इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com