Dr. Anil Ramod : डॉ. अनिल रामोड यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना वाढवून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामोड यांना आठ लाखांची लाच
bribe case Dr Anil Ramod likely to interrogated by ED crime farmer pune
bribe case Dr Anil Ramod likely to interrogated by ED crime farmer punesakal
Updated on

पुणे : अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची आता सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) ईडीला पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, डॉ. रामोडप्रकरणी सीबीआयकडून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

bribe case Dr Anil Ramod likely to interrogated by ED crime farmer pune
Anil Ramod : डॉ. अनिल रामोडांकडून गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक चुका...आणि मोठी रोकड मिळवली; सीबीआयची माहिती

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना वाढवून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. रामोड यांना आठ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ जून रोजी अटक केली होती. डॉ. रामोड यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी आणि त्यानंतर २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

bribe case Dr Anil Ramod likely to interrogated by ED crime farmer pune
Dr. Anil Ramod : रामोड कुटुंबीयांच्या खात्यात ४७ लाखापेक्षा जास्त रक्कम; सीबीआयची माहिती

डॉ. रामोड यांच्या घरझडतीमध्ये सहा कोटी ६४ लाखांची रोकड आणि कार्यालयातून एक कोटी २८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांच्या नावे विविध स्थावर मालमत्ता असून, त्याची किंमत पाच कोटी ३० लाख रुपये आहे. दरम्यान, डॉ. रामोड हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करीत नाहीत. तसेच, त्यांच्या मालमत्तेबाबत आणखी काही कागदपत्रे आणि ऑडिओ क्लिप्स सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com