उत्रौली - भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात झालेला पाऊस आणि गारांमुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाळत घातलेल्या कच्च्या विटा विरघळल्याने आणि माती वाहून गेल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत..कच्च्या विटांभोवती पाणी साचल्याने त्या पूर्णपणे खराब झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे विटांवर कागद टाकण्यासही वेळ मिळाला नाही. सोलापूर, कर्नाटक आणि वाडा येथून आलेल्या मजुरांच्या मजुरीचा आणि आगाऊ दिलेल्या रकमेचा प्रश्न आता मालकांसमोर उभा ठाकला आहे. प्रत्येक मालकाचे २० ते २५ हजार विटांचे नुकसान झाले आहे..शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या नुकसानीचेही पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी हनुमंत शिवतरे, धनंजय हर्णसकर यांच्यासह स्थानिक उत्पादकांनी केली आहे.एक हजार कच्ची वीट बनविण्यासाठी माती, राख, पाणी, भुस्सा, मजुरी यासाठी ५००० खर्च करावा लागतो. वीटभट्टी मालकांच्या दीड हजारापासून वीस हजारांपर्यंत कच्च्या विटा खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी उत्रौलीतील मनीषा कुंभार यांनी केली आहे..१० - वीटभट्टी व्यावसायिक१ लाख २० हजार - एकूण विटांचे नुकसान४० ते ५० लाख रुपये - एका वीटभट्टीसाठीची गुंतवणूक५ हजार रुपये - १००० कच्च्या विटांच्या निर्मितीचा खर्च .अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते, त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसान भरपाई द्यावी.- अशोक कुंभार, वीटभट्टी मालक उत्रौली (ता. भोर).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.