

‘अणुसुरक्षेच्या नियमांचे
पालन व्हायला हवे’
‘ब्रिक्स’ परिषदेत वाढत्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त
नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) : नागरी पायाभूत सुविधांवर; तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) पूर्ण सुरक्षाव्यवस्थेखाली असलेल्या शांततामय अणुसुविधांवर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक हल्ल्यांबद्दल ‘ब्रिक्स’ देशांच्या नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सशस्त्र संघर्षाच्या काळातही अणुसुरक्षेच्या नियमांचे पालन कायम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसीय ‘ब्रिक्स’ परिषदेत शनिवारी पहिल्याच दिवशी ‘नवी दिल्ली जाहीरनामा’ स्वीकारण्यात आला. त्यात या नेत्यांनी अण्वस्त्र संघर्षाच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या जाहीरनाम्यामध्ये कोणत्याही देशाचे नाव घेण्यात आलेले नाही. आंतरराष्ट्रीय कायदा आणि आयएईएच्या संबंधित ठरावांचे उल्लंघन करून नागरी पायाभूत सुविधा तसेच आयएईएच्या पूर्ण सुरक्षाव्यवस्थेखालील शांततामय अणुसुविधांवर करण्यात येणाऱ्या जाणूनबुजून हल्ल्यांबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो. सशस्त्र संघर्षाच्या काळातही अणुसुरक्षा, अण्वस्त्रांशी संबंधित सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षा उपाय कायम राखले पाहिजेत. नागरिक आणि पर्यावरणाला होणारी हानी टाळण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले.
जागतिक स्थैर्य तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी निःशस्त्रीकरण, शस्त्रनियंत्रण आणि अण्वस्त्र प्रसारबंदीची व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरजही यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. अण्वस्त्रमुक्त क्षेत्रांच्या महत्त्वाचा उल्लेख करताना, अण्वस्त्र प्रसारबंदीची व्यवस्था मजबूत करण्यासाठी अशा क्षेत्रांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व अण्वस्त्रमुक्त क्षेत्रांना, तसेच अण्वस्त्रांचा वापर किंवा वापराची धमकी न देण्याच्या संबंधित हमींना जाहीरनाम्यामध्ये पाठिंबा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.