पुणे: निलायम चित्रपटगृहाजवळील पूल वाहतुकीसाठी बंद 

प्रसाद पाठक
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : पर्वती पायथ्यालगतच्या कॅनाँल येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी निलायम चित्रपटगृहाजवळील राजर्षी शाहु महाराज पुल नउ जुलै पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

पुणे : पर्वती पायथ्यालगतच्या कॅनाँल येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी निलायम चित्रपटगृहाजवळील राजर्षी शाहु महाराज पुल नउ जुलै पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

पुलाच्या दोन्ही बाजूला पर्यायी वाहतुक व्यवस्थेचे फलक लावण्यात आले आहेत. लोखंडी पत्रे, बँरीकेडस टाकून पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. 

नउ जुलैपर्यंत पुल बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. असे महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वाहतूक विभागाने आवाहन करूनही बेशिस्त पुणेकर बिनधास्तपणे मिळेल त्या अरूंद वाटेतून वाहने दामटत आहेत. 
एकीकडे प्रशासनाच्या व नगरसेवकांच्या नावाने शंख करायचा आणि दुसरीकडे पुणेरी पाट्या लावत नियमांचे उल्लंघन करणाऱ्याबद्दल स्थानिक नागरिक चीड व्यक्त करत आहेत.

Web Title: bridge closed for traffic near Nilayam theatre in Pune