
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार येथील मुळा मुठा कालव्यावरील पूल काही काळासाठी अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सध्या जड वाहनास पर्यायी मार्ग उरुळी कांचन, डाळिंब ते शिंदवणे मार्ग व जेजुरी व सासवड कडे जाणारे वाहन यवत, भुलेश्वर घाट, माळशिरस, वाघापूर चौफुला असे पर्याय मार्ग तयार केले आहेत.