Talegaon Dhamdhere News : तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीवरील पूल खचल्याने वाहतूक बंद

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील वेळ नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला असून, पुलावरील भरावा गेला वाहून.
Bridge Over Vel River in Talegaon Dhamdhere Collapses

Bridge Over Vel River in Talegaon Dhamdhere Collapses

sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील वेळ नदीवरील पूल पुराच्या पाण्याने खचला असून, पुलावरील भरावा वाहून गेला आहे. पुलावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अहिल्यानगर- पुणे महामार्गाने कासारी फाटा मार्गे पीएमआरडीए च्या बाह्यवळण रस्त्याने तळेगाव ढमढेरे येथून पुण्याकडे होणारी वाहतूक दोन दिवसांपासून बंद आहे. वेळ नदीवरील धोकादायक पूल नवीन बांधण्याची मागणी प्रवासी, वाहन चालक व ग्रामस्थ करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com