Loni Kalbhor News : पूल अजूनही कागदावरच! ३३.५२ लाखांचे काम गेले ८० लाखांवर

कुंजीरवाडी येथील नव्या उजव्या कालव्यावर उभारला जाणारा महत्त्वाचा पूल गेली अनेक वर्षे प्रत्यक्षात येण्याऐवजी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आले समोर.
kunjirwadi canal bridge

kunjirwadi canal bridge

sakal

Updated on

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची, तरडे तसेच इतर गावांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा आणि कुंजीरवाडी येथील नव्या उजव्या कालव्यावर उभारला जाणारा महत्त्वाचा पूल गेली अनेक वर्षे प्रत्यक्षात येण्याऐवजी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१४ साली ३३.५२ लाख रुपयांची मंजुरी मिळालेल्या या पुलाचा खर्च आज तब्बल ८० लाखांच्या पुढे पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरू झालेले नाही. तीन वेळा निविदा प्रक्रिया पूर्ण आणि सर्व प्रशासकीय मंजुरी असून अद्यापही काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com