Praibha naik
sakal
कात्रज - चार मुलींच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी आयुष्याची पुंजी पणाला लावली. दोघेही कष्ट करून संसाराचा गाडा हाकत होते. मुलींनी शिकून मोठे व्हावे, आपल्या पायावर उभे राहावे, हीच त्यांची स्वप्ने होती. मात्र, दहावीत शिकणाऱ्या प्रतिभाचे कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघाती निधनाने या कुटुंबाच्या स्वप्नांवरच जणू काळाने घाला घातला. सोलापूर जिल्ह्यातील हे कुटुंब रोजगाराच्या शोधात पुण्यात आले.