esakal | मला जेलमध्ये माेबाईल अन् सीमकार्ड आणून दे'
sakal

बोलून बातमी शोधा

pune

मला जेलमध्ये माेबाईल अन् सीमकार्ड आणून दे'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसूल करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून दोन सॅमसंगचे मोबार्इल, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर, अशा सूचना दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

या प्रकरणी सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांनी अटक केली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. ती पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केली.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र देण्यास ३० दिवसांची मुदतवाढ

दरम्यान, राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला ॲड. विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. राणी आणि सागरची पत्नी जिग्नेशा राजपूत यांनी मिळून फिर्यादीला धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले आहे. तिच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत. पैसे मिळण्यासाठी ती साक्षीदारांच्या घरी जाऊन राहत आहे. सागर याने सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून त्यांच्या साथीदारांना पैसे कसे वसूल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तिची जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. मुरळीकर यांनी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली आहे.

loading image
go to top