esakal | शरद पवार यांच्याकडून पहिल्या निवडणुकीला उजाळा
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

शरद पवार यांच्याकडून पहिल्या निवडणुकीला उजाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगवी: ‘‘जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळेच माझा राजकीय प्रवास यशस्वी झाला. त्यासाठी गावागावातील सहकाऱ्यांचे योगदान कायम स्मरणात राहील,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

कांबळेश्वर (ता. बारामती) येथील प्रगतशील शेतकरी झुंबरराव खलाटे यांचे नुकतेच निधन झाले. खलाटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी शरद पवार कांबळेश्वर येथे आले होते. यावेळी पवार यांनी राजकारणातील निष्ठावंत समर्थक दिवंगत गजाबापू खलाटे यांची आठवण काढली. पवार म्हणाले, १९६७ साली बारामती तालुक्यात सुरवातीला पहिली निवडणूक लढवली. त्याकाळी मोठ्या राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यावेळी गजाबापू खलाटे माझ्या सोबत कायम ठाम राहिले. गजाबापू व झुंबरराव खलाटे यांच्यासारख्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी मला साथ देऊन आजपर्यंतचा राजकीय प्रवास यशस्वी करण्यास मोठी मदत केली.

कांबळेश्वर येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून कळमराज, भिवाई पाणी पुरवठा लिप्टची स्थापना केल्याची आठवण पवार यांनी काढली. यावेळी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांनी झुंबरराव खलाटे यांच्या जीवन प्रवासाची तसेच गावातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी बाबूराव खलाटे, रामराजे खलाटे, करण खलाटे, सुभाषराव शिंदे, सदाबापू सातव, योगेश जगताप, धनंजय खलाटे, उज्ज्वल खलाटे आदी उपस्थित होते.

loading image
go to top