

The remarks were made during the launch of the Marathi book 'China Bhetitil Bhashane: Rabindranath Tagore' in Pune.
Sakal
पुणे : ‘‘विवेकवाद, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनी आयुष्यभर ‘अतिराष्ट्रवादाला’ विरोध केला आणि जागतिक बंधुभावाची भूमिका मांडली. मात्र, १९२४ मध्ये चीन दौऱ्यावर गेलेल्या टागोरांना तेथील तरुणांकडून ‘गो बॅक’च्या घोषणांचा सामना करावा लागला. हा विरोध त्यांच्या विचारांमुळे नव्हे, तर ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे भारताविषयी चीनमध्ये निर्माण झालेल्या ऐतिहासिक कटुतेतून उद्भवला होता,’’ असे मत माजी सनदी अधिकारी आणि लेखक सतीश बागल यांनी व्यक्त केले.