कात्रजच्या चाळीत राहणाऱ्या दिव्यांग दिक्षाला ब्रिटिश स्कॉलरशिप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Scholarship to handicapped Diksha dinde Katraj

कात्रजच्या चाळीत राहणाऱ्या दिव्यांग दिक्षाला ब्रिटिश स्कॉलरशिप!

कात्रज - गर्ल ऑन 'विंगचेअर', ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून ओळख असलेल्या कात्रजमधील दिक्षा दिंडे या दिव्यांग तरुणीची ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ७५ मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली असून त्यामध्ये दिक्षाची निवड झाली आहे. सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दिक्षा जन्मापासून सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेली आहे आहे. ८४टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याच्या समस्यायामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली होत नाहीत. पण, असे असताना महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर तिने आकाशाला गवसणी घालणारे हे यश मिळवले आहे.

व्हील चेअरशिवाय फिरता न येणाऱ्या आणि अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या दिक्षाला जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून बोलावलं जाते. उच्च शिक्षण, नोकरी आणि तिचं सामाजिक काम यामुळे ती अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. पुण्यातील वस्तीतील मुलाचं शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या आणि मासिक पाळी यासगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दिक्षाने काम करायला सुरुवात केल्यानंतर २०१६मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची 'ग्लोबल युथ अँबेसिटर' म्हणून तिची निवड झाली.

शाश्वत विकास', ‘तरुणांचे नेतृत्व', 'दिव्यांगांचे अधिकार' या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया आणि इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. तिने आणि काही सहकाऱ्यांनी मिळून झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली. त्यानतंर सिग्लनवर भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला आहे.

काय आहे ब्रिटिश सरकारची चेवनिंग स्कॉलरशिप

चेवनिंग स्कॉलरशिप ही ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित स्कॉलरशिप समजली जाते. ती अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे. परंतु, त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आहेत. दरवर्षी या स्कॉलरशिपसाठी १५०० मुलांची निवड करण्यात येते. जगभरातील १६० देशांमधून यावर्षी ६८ हजार मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यामधून दिक्षाची निवड झाली आहे.

अपंगत्वामुळे अनेक ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागला. या माझ्या यशात आजपर्यंत माझ्या अनेक सुख दुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभी असलेल्या माझ्या आईने खूप मेहेनत घेतली. अनेकांनी लहानपणापासून आईला अनेक सल्ले दिले की, मला स्पेशल शाळेत टाका, वसतिगृहात टाका. पण, आईने माझ्यासाठी खूप मेहेनत घेत मला शिकवलं. कात्रजच्या महापालिकेच्या शाळेतून सुरू झालेला प्रवास आज ब्रायटेनमध्ये पोहचला आहे.

- दिक्षा दिंडे, कात्रज.

Web Title: British Scholarship To Handicapped Diksha Dinde Katraj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top