
पुणे : पुणे महापालिकेत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार म्हणून लागल्यानंतर अनेकांना राजकारण्यांकडे घरगडी म्हणूनच काम करावे लागत आहे. बहुतांश कर्मचारी राजकीय नेत्यांच्या घरी झाडणे, भाजी आणणे, घरातील कामे करणे, माळीकाम करणे यासह अनेक कामांत गुंतवले गेले आहेत. जर या कामगारांनी या पुढाऱ्यांच्या घरी काम करण्यास नकार दिला तर त्यांना थेट कामावरून काढले जात आहे.