....म्हणून 'त्याने' बहिणीच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आरोपी विष्णू हा नंदा यांचा भाऊ आहे. नंदा व त्यांचा पती मोहन यांच्यात वारंवार भांडण होत. ही भांडणे सोडविण्यासाठी विष्णू यायचा. रविवारी रात्री विष्णू हा मोहन यांच्या घरी आला होता. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.

पिंपरी : मेहुण्याने बहिणीला त्रास देणाऱ्या तिच्या पतीचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना भोसरी येथे घडली. खुनानंतर आरोपीने स्वतःच पोलिस नियंत्रण कशाला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.
 

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोहन बाबुराव लेवडे (वय 45) असे खून झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी नंदा लेवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू मुंजाजी जगाडे (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

आरोपी विष्णू हा नंदा यांचा भाऊ आहे. नंदा व त्यांचा पती मोहन यांच्यात वारंवार भांडण होत. ही भांडणे सोडविण्यासाठी विष्णू यायचा. रविवारी रात्री विष्णू हा मोहन यांच्या घरी आला होता. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात विष्णू याने मोहनच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये मोहन यांचा मृत्यू झाला. आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पीएमपीच्या महिला वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरांतून होतेय कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother killed Sister's husband attacking by sharp weapon on head at Bhosri Pimpri