बांधाच्या कारणावरून धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा लोखंडी घण व दगडाने मारहाण करून खून ; माढा तालुक्यातील जाखले येथील घटना

बांधाच्या कारणावरून धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा लोखंडी घण व दगडाने मारहाण करून खून ; माढा तालुक्यातील जाखले येथील घटना

Published on

बांधाच्या कारणावरून मोठ्या भावाचा खून
माढा तालुक्यातील जाखले येथील घटना; संशयित आरोपीस अटक

टेंभुर्णी ता. १५ : शेतीच्या बांधाच्या कारणावरून सतत होणाऱ्या भांडणावरून धाकट्या भावाने सख्ख्या थोरल्या भावास लोखंडी घन व दगडाने जबर मारहाण करून त्याचा खून केला. माढा तालुक्यातील जाखले येथे शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घडली. टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.
हनुमंत रघुनाथ गायकवाड (वय ६७, रा. जाखले, ता. माढा, जि. सोलापूर) असे मयताचे नाव आहे. तर उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड (रा. जाखले, ता. माढा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. शनिवार (ता. १४) रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जाखले गावच्या हद्दीतील गायकवाड वस्ती येथील जमीन गट नंबर ७९/१ मधील नवनाथ गायकवाड यांच्या गुरांच्या गोठ्यात हनुमंत रघुनाथ गायकवाड व त्यांचा लहान भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड यांच्यात शेताच्या बांधाच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली. संशयित आरोपी उत्तरेश्वर यांनी हनुमंत यांच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर लोखंडी घन व दगडाने जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत हनुमंत गायकवाड यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षक वामन धोंडीबा पवार(वय ७०, रा. चौभेपिंपरी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा करण्यात आला आहे. संशयित आरोपीस उत्तरेश्वर गायकवाड यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौधरी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com