esakal | धक्कादायक! सख्या भावांनी घेतला एक दिवसाच्या अंतराने जगाचा निरोप

बोलून बातमी शोधा

Dashrath and Arjun

कधी थांबणार हे! सख्या भावांनी पाठोपाठ गमावला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारगाव - लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील दशरथ बापूराव रोडे पाटील (वय ५१) व अर्जुन बापूराव रोडे पाटील ( वय ४९) या दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे एक दिवसाच्या अंतराने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

येथील शेतकरी कुटुंबातील चार भावांच्या रोडे पाटील कुटुंबातील सहकारी सोसायटीचे माजी संचालक दशरथ रोडे पाटील व तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अर्जुन रोडे पाटील या दोन भावांना मागील आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला. दशरथ रोडे पाटील यांच्यावर निफाड येथे उपचार सुरु होते तर अर्जुन रोडे पाटील यांच्यावर मंचर येथे उपचार सुरु होते.

दशरथ रोडे पाटील यांचे शुक्रवारी (ता. ३०) एप्रिल रोजी निधन झाले तर दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. १) मेला अर्जुन रोडे पाटील यांचे निधन झाले. दशरथ यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार व अर्जुन यांच्याही मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.