Pune BRT : बीआरटी उखडली; ३३ कोटी पाण्यात

पुणे महापालिकेने तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून नगर रस्त्यावर बीआरटी सेवा सुरु केली.
BRT Route Remove
BRT Route RemoveSakal

पुणे - पुणे महापालिकेने तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून नगर रस्त्यावर बीआरटी सेवा सुरु केली. पण बीआरटी मार्गातून गेलेली मेट्रो, मार्गाची तोडफोड आणि तुटलेल्या रेलिंगमुळे हा बीआरटी मार्ग धोकादायक झाला होता. गोखले इंस्टिट्यूटचा अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तडकाफडकी हा मार्ग उखडून टाकण्याचा निर्णय घेतला.

पुणे शहरात सोलापूर रस्ता, सातारा रस्त्यावर बीआरटी केल्यानंतर महापालिका प्रशासनाने २०१६ मध्ये नगर रस्‍त्यावरील बीआरटी सेवा सुरु केली. ही सेवा सुरु करण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेतली होती. पण ही सेवा सुरु झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण वाढले. तसेच मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्ग काढून टाकण्यात आल्याने या सेवेच्या उद्देशाला हरताळ फासला गेला.

दरम्यान, नगर रस्‍त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बीआरटी मार्ग काढून हा रस्ता मोठा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यासाठी आंदोलनेही झाली. विधानसभेतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होत. त्यावर अभ्यास करण्यासाठी प्रशासनाने गोखले इंस्टिट्यूट संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने जेथे मार्गाची तोडफोड झाली आहे, अशा धोकादायक ठिकाणची बीआरटी काढून टाकावी असा अभिप्राय दिला. त्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली.

माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘ज्या नागरिकांकडे स्वतःची वाहने नाहीत अशा सर्वसामान्य लोकांसाठी बीआरटी सेवा महत्त्वाची होती पण हा मार्ग काढून त्यांची गैरसोय केलीच. पण नागरिकांचे कोट्यावधी रुपये वाया घातले आहेत. अपघाताचे कारण देत बीआरटी मार्ग काढला असेल तर शहरात इतर रस्त्यांवर अपघात होत नाहीत का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

आमदार सुनील टिंगरे म्हणाले, ‘गेले चार वर्ष हा बीआरटी मार्ग काढून टाकावा यासाठी पाठपुरावा करत होतो. गोखले संस्थेने केलेल्या अभ्यासात आम्ही मांडत असलेली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट झाले. आगामी काळात नगर रस्ता सिग्नल मुक्त करण्यासाठी काम करणार आहे.

विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे म्हणाले, ‘बीआरटी मार्ग काढण्यासाठी ३६ तास उपोषण केले, इमेल मोर्चा,अनेकदा निवदेन दिले होत. या लढ्यास काही यश मिळाले.’

अधिवेशनाच्या तोंडावर कारवाई

गोखले इंस्टिट्यूटकडून महापालिकेला मंगळवारी (ता. ५) बीआरटीचा अहवाल प्राप्त झाला. पण याबद्दल केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती होती. याची जास्त चर्चा न होऊ न देता बुधवारी रात्री (ता. ६) अचानक कारवाई करून हा मार्ग काढून टाकण्याचे काम सुरु केले. दरम्यान नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झालेले असताना त्यापूर्वीच रात्रीतून हा बीआरटी काढून टाकण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com