
वारजे माळवाडीहून ही बस वाघोलीच्या दिशेने जात होती. BRT मार्गात दुचाकी घुसल्यावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी बसला धडकली.
पुणे : पुणेकरांच्या नव्या आठवड्याची सुरुवात एका धक्कादायक प्रकाराने झाली आहे. BRT घुसलेल्या एका दुचाकीमुळे PMPML ची CNG बस जळून खाक झाली. चंदननगर खराडी बायपास येथे आज सकाळी पावणे दहा वाजता बी.आर.टी मार्गमध्ये बस व दुचाकी यांची धडक झाली. अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला तर वाहनंचालक सह सर्व प्रवाशी सुखरूप असल्याी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
सकाळी बीआरटी मार्गात झालेल्या अपघातात दुचाकी स्वार अजिंक्य येवले हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. तर बसमधील एकूण वीस प्रवाशी सुखरूप आहे. वारजे माळवाडीहून ही बस वाघोलीच्या दिशेने जात होती. दरम्यान, बीआरटी मार्गातून जाणार्या दुचाकीस्वाराने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने बसला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार दूरवर फेकला गेल्याने डोक्यावरचे हेल्मेट फुटून डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे. तर दुचाकी बसच्या खाली गेल्याने ती जागेवरच अडकली त्यामुळे प्रथम दुचाकीने पेट घेतला काही क्षणातच बस मधून धूर येण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखून चालकाने बसमधील एकुण वीस प्रवाशांना खाली उतरवल्याने त्याचे प्राण वाचवले. बघता बघता काही वेळातच दुचाकीसह बसने पेट घेतला. या भीषण अपघातामध्ये बस व दुचाकी जागीच जळून खाक झाली.
बोहल्यावर चढण्यासाठी लागणार पोलिसांची परवानगी
दरम्यान या प्रकारामुळे पीएमपीएल प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात पीएमपी बस पेटल्याच्या काही घटना होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिरूर-सातारा मार्गावर सीएनजी गॅसचा ट्रकने घेतला पेट
दरम्यान, आज पहाटेच शिरूर-सातारा मार्गावर केडगाव ( ता.दौंड ) जवळ सीएनजी गॅसचा ट्रक पलटी होऊन पेटल्याने जळून खाक झाला. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग सुमारे १०० फुट उंचीपर्यंत गेली.. सुदैवाने पेट्रोलपंपास कोणतीही हानी झाली नाही. या अपघातात जिवीतहानी नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद होती.