किवळेतील पदपथावर कचरा

किवळेतील पदपथावर कचरा
Published on

किवळे, ता. ६ : येथील के व्हिले परिसरातील बीआरटी मार्गावरील पदपथावर सुमारे १०० फूट अंतरापर्यंत कचरा टाकण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, मोशी येथील दुर्घटनेमुळे कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यास अडथळे येत असल्याचे कारण वारंवार दिले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
रावेत येथील गृहिणी मधुरा वेरुकर म्हणाल्या,‘‘बीआरटी पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे फिरायला येणारे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने तातडीने कचरा हटवून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com