दौंड - शहरात एका तरूणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मावस बाहिणीशी वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केल्याच्या रागापोटी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. .शहरातून जाणाऱ्या दौंड - श्री क्षेत्र सिध्दटेक अष्टविनायक मार्गालगत असणार्या भीमनगर भागात ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री हा खून झाला. केतन विनोद सुडगे (वय-२२, रा. भीमनगर, दौंड) या तरूणाचा खून झाला आहे. केतन सुडगे याने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या काही नातेवाइकांना मान्य नव्हता व त्यावरून केतन सुडगे याच्या पत्नीच्या नातेवाईकांचा केतन याच्याविषयी आकस होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते..दरम्यान ६ सप्टेंबर रोजी त्या रागापोटी निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे व विक्रांत कांबळे यांनी केतन सुडगे याच्याबरोबर वाद घालत त्याला मारहाण केली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन विटा आणि गटारीच्या चेंबरची काँक्रीट चौकटीने केतन याला अमानुष मारहाण केली. त्यात केतन जागीच मृत्यूमुखी पडला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे..दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अक्षय विनोद सुडगे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार निखिल चितारे, प्रेम जाधव, विवेक कांबळे व विक्रांत कांबळे (चौघे रा. भीमनगर, दौंड) यांच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून करणे) व कलम ३ मधील ५ (दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाकरिता गुन्हेगारी कृत्य करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक संशयित जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने व पोलिसांची भीती न राहिल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक टोळके राजरोसपणे वावरत आहेत. समाजविरोधी कृत्ये करणार्यांवर पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे..२२ दिवसांत दुसरा खूनदौंड शहरात १४ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकर असलेल्या प्रविण दत्तात्रेय पवार (वय-३५, रा. इंदिरानगर, बाजारतळाजवळ, दौंड) याचा निर्घृणपणे खून केला होता. खून केल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे हत्यारासह पायी निघाला होता..४ सप्टेंबर रोजी भरचौकात वीस जणांचा एक जमाव तब्बल दहा मिनिटे एका विद्यार्थ्याला महाविद्यालयापासून चौकापर्यंत तुडवत असताना चौकात एकही पोलिस अंमलदार उपस्थित नव्हते. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वरिष्ठ फक्त औपचारिकता म्हणून बैठका घेत असून त्यांना दौंड पोलिस ठाण्यातील वास्तविक स्थितीचा अंदाज नसल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थित खालावत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.