

बीएसएनएल डक्ट दुर्घटना
---
पिंपरी, ता. ३० ः निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या डक्टमध्ये दोन मजुरांना ‘आम्ही कामासाठी पाठवले नव्हते,’ असे बीएसएनएल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ‘आम्ही चोरीसाठी गेलो होतो’, असे मृत मजुरांच्या तीन साथीदारांनी पोलिसांना सांगितले. मजुरांच्या मृत्यूची जबाबदारी अद्याप अनिश्चित असल्याने रविवारी (ता. ३०) रात्री आठपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
पोलिसांकडे नातेवाईकांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांबाबत कोणतीही नोंद नाही. त्यामुळे ते डक्टमध्ये नेमके कशासाठी उतरले होते, हा प्रश्न कायम आहे. चोरीचे कारण सांगा, असा त्यांच्या साथीदारांवर दबाव आहे का, या दिशेने पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
घटनास्थळी पोलिसांना खोदकामासाठी लागणारे टिकाव, इतर साहित्य आणि दोन मोबाइल आढळले होते. तेथे कोणत्याही कामगाराला कामासाठी पाठविले नसल्याचे बीएसएनएल अधिकारी व ठेकेदारांचे म्हणणे असल्याने गुंता कायम आहे.
---
मृत मजुरांचे नातेवाईक घटना घडल्यानंतर पळून गेले होते. हिंगोलीमधून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मनोज शिंदेने बोलवल्यानुसार केबल चोरीसाठी गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कोणाचेही आधीचे चोरीचे रेकॉर्ड नाही. ते नेमके चोरीसाठीच गेले होते का, यात आणखी कोणी सामील आहे का, याची चौकशी सुरू आहे. अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.
- प्रशांत ढोले, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.