

बुद्ध पौर्णिमेनिमित्त १ मे रोजी देशभक्ती मिरवणूक
संत हवा मल्लिनाथ महाराज देणार एकात्मतेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २८ : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून १ मे रोजी शहरात ‘देशभक्ती मिरवणूक’ काढण्यात येणार आहे. जय भारत माता सेवा समिती (नवी दिल्ली) यांच्या वतीने हा सोहळा आयोजित केला. राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या सहभागातून एकात्मतेचा संदेश सोलापूरकरांना दिला जाणार आहे, अशी माहिती उद्योगपती सोमनाथ साखरे यांनी दिली.
सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात होईल. सकाळी १० वाजता चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर ही मिरवणूक डफरिन चौक, कामत हॉटेल चौक, व्हीआयपी रोड, संगमेश्वर कॉलेज मार्गे हेरिटेज लॉन येथे पोहोचेल. तेथे देशभक्तिपर कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज हे तिरंगा हाती घेऊन अखंड भारत प्रवास करत असून नागरिकांमध्ये संवैधानिक कर्तव्यांची जाणीव करून देत आहेत. नागरिकांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हणमंत कावळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.