दौंडमध्ये म्हशीला झालं जुळं; आयव्हीएफ तंत्राचा देशातील पहिलाच प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

-आयव्हीएफद्वारे म्हशीला झाले जुळे 

-पुणे जिल्ह्यातील घटना :  देशातील पहिलाच प्रयोग

पुणे  : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू येथेआयव्हीएफ तंत्राद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्राच्या माध्यमातून गर्भधारणा झालेल्या म्हशीच्या पोटी नुकतीच जुळी पारडे जन्माला आली आहेत. भारतातील ही पहिलीच घटना ठरली आहे. यासाठी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचा (एआरटी) वापर करण्यात आला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील पशूसंवर्धन क्षेत्रात काम करत असलेल्या एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने हा नाविण्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे. या संस्थेच्यावतीने सध्या देशभरात गाई व म्हशी प्रजनन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

दौंड तालुक्यातील राहू गावाजवळ असलेल्या सोनवणे बफेलो फार्म’मधील चार म्हशींची आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गर्भधारणा करण्यात आली. या चार म्हशींनी मिळून पाच पारडांना जन्म दिला आहे. यापैकी एका म्हशीला जुळे झाले आहे.म्हशींमधील जगातील नामांकित समजल्या जाणाऱ्या मुऱ्हा जातीची ही पारडे आहेत. 

राष्ट्रीय गोकुळ योजनेंतर्गत  आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गाईंपासून वासरे जन्माला घालण्याचे काम ही संस्था पूर्वी करीत होती. आता असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने म्हशीचे पारडू जन्माला घालण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेमंड समुहाच्या अख्त्यारितील जेकेबोवाजेनिक्स या संस्थेने हा प्रयोग केला आहे.यामुळे देशातील दूग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकणार आहे. 

पहिले आयव्हीएफ वासरू 

दरम्यान, भारतात गोठलेल्या आयव्हीएफ भ्रूणापासून आयव्हीएफ वासरू जन्माला घालण्याचा पहिला प्रयोग ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे भारतात दुभती जनावरे व म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशातील म्हशींची संक्षिप्त माहिती

 देशातील म्हशींची संख्या --- १० कोटी ९० लाख. 

- जगातील एकूण म्हशींच्या तुलनेत टक्केवारी ---- ५६ टक्के.

आयव्हीएफचा आतापर्यंतचा प्रवास

- मागील १६ महिन्यांत गीर जातीच्या गौरी या गाईमध्ये आयव्हीएफ तंत्राने तब्बल ९४ वेळा गर्भधारणा.

- या ९४ आयव्हीएफ गर्भधारणांपैकी ६४  गर्भधारणा  संस्थेच्या ‘फार्ममध्ये.

- उर्वरीत ३० गर्भधारणा या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात पूर्ण.

- यापैकी आतापर्यंत ३९ वासरांचा जन्म. 

- उर्वरित वासरे या वर्षात जन्माला येण्याची अपेक्षा.

- या नवीन उपक्रमामुळे गुरांच्या प्रजनन तंत्रामध्ये मोठी क्रांती घडणार.

- साधारणत: एक गाय तिच्या आयुष्यभरामध्ये केवळ ८ ते १ ० वासरांना जन्म देते.

- आयव्हीएफ तंत्राच्या नव्या प्रयोगामुळे मादी प्राण्यांची संख्या देशात वेगाने वाढण्याचा मार्ग सुलभ होणार
एकात्मिक पशुधन विकास (आयएलडीसी) केंद्रांची संख्या --- २५७०.

- या केंद्रांच्या माध्यमातून गाई आणि म्हशी प्रजनन सुधार कार्यक्रमाची अंमलबजावणी.

आयव्हीएफच्या प्रगतीचे टप्पे

- देशातील १० राज्यांतील ९८ जिल्ह्यांत उपक्रम सुरु.

- देशातील सुमारे २५ हजार गावांमधील २५  लाख शेतकऱ्यांना पशू प्रजनन,  पशूवैद्यकीय सेवांचा पुरवठा.

 - आतापर्यंत १ कोटी ७० लाख ६२ हजार इतकीकृत्रिम रेतन निर्मिती.

- आजपर्यंत ४२ लाखांहून अधिक वासरांचा क्रॉसब्रेड स्वरुपात जन्म.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The buffalo became twins through IVF