Crime News : कत्तलखान्याकडे नेताना सासवडमध्ये 80 म्हशी, रेडके पकडली; सहाजणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buffalo

सहा वाहनांतून जनावरे कत्तलीकरता घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडली.

Crime News : कत्तलखान्याकडे नेताना सासवडमध्ये 80 म्हशी, रेडके पकडली; सहाजणांना अटक

सासवड, जि. पुणे - येथे 80 लहान मोठी रेडके व म्हशी क्रुरतेने व दाटीवाटीने कोंबुन चारापाणी व औषधोपचाराची व्यवस्था न करता.. ही जनावरे सहा वाहनांतून कत्तलीकरता घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडली. पोलीसांना माहिती देत फिर्याद दिली असता.. वाहने व जनावरे असा सुमारे 36 लाख 46 हजार रुपयांचा मालही पोलीसांनी जप्त केला. तसेच सहाही आरोपींनी रात्री उशिरा अटकही केली आहे.

सासवड (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत सासवड ते जेजुरी मार्गावर कऱहा नदीच्या पुलाजवळ तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी या सहा वाहनांसह त्यातील जनावरे पकडण्याची घटना काल रात्री घडली. याबाबत आज सासवड पोलीसांनी ही माहिती दिली. याप्रकरणी आरोपी-1) वाहीद इब्राहीम कुरेशी (वय-42, रा. सदरबजार, सातारा ता. जि. सातारा) 2) असीफ गणी शेख (वय-52, रा. मल्हारपेठ, सातारा. ता. जि. सातारा) 3) शब्बीर युनुस मुलाणी (वय-42, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) 4) अमीर हारून मुलाणी (वय-20, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) 5) महमद अली मोहीनोदिन कुरेशी (वय-23, रा. सदरबजार, सातारा) 6) मुस्तकीन जावेद कुरेशी (वय-22, रा. सदरबजार, सातारा) या सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अटक आहेत. असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आल्याचे अक्षय कांचन गोरक्षक यांनी सांगितले.

याबाबतीत सामाजिक जाणिवेतून काम करणाऱया समुहाच्या वतीने ऋशीकेष नंदकुमार भागवत (वय 23, व्यवसाय खाजगी नोकरी, रा.शिवाजीनगर, एकबोटे हाँस्पिटल पुणे 5) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार सासवड पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11(1), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 9 (अ), मो.वा.कायदा कलम 83/177 भा.द.वि. कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे फिर्यादी ऋषिकेश भागवत यांस कत्तलखान्याकडे घेऊन जाणारी जनावरे पकडून देण्यास मदत करणारे गोरक्षक म्हणून काम करणारे अक्षय कांचन (रा. उरुळी कांचन), ऋषिकेश कामठे (रा. हडपसर), रक्षक लगत, ऋषिकेश शेटे, अक्षय पवार (सर्व रा.भोर) आदींचे मोलाचे सहकार्य झाले.

'कत्तलखान्याकडे ह्या म्हशी, रेडके व पारडी बिना पाणी, बिना चारा व दाटीवाटीत बांधून चालवली होती. दाटीवाटीने कित्येक जनावरे जखमी झाली होती. त्यांच्याकरीता औषधोपचाराची व्यवस्था न करता जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना व खरेदी विक्रीच्या पावत्या नसताना हे गुन्हेगार वाहतुक करीत होते. त्यात एक वीस हजार रुपये किंमतीची म्हैस वाहनातच मृत झाल्याचे वाहन पकडल्यावर आढळले. या महिन्यातच बोपगाव (ता.पुरंदर) येथेही आम्ही या सातारकर गुन्हेगारांचे एक वाहन व जनावरे कत्तलखान्याकडे जाताना पकडले होते. या गंभीर गुन्ह्यावर काही तरी ठोस परिणामकारक उपाय हवा. आम्ही जनावरे पकाडायची, नाही पकडली तर राजरोसपणे ह्या हत्त्या चालल्याच आहेत. याची खंत वाटते.'

- अक्षय कांचन, गोरक्षक (रा. उरुळी कांचन, ता. हवेली)

टॅग्स :crimeArrestedBuffaloes