Pune Wall Collapse  : कोंढवा दुर्घटने प्रकरणी बिल्डरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg

पुणे  : कोंढवा दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन बिल्डरांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला.

अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे बिल्डरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी त्यांना उच्च न्यायालयात अपील करावे लागणार आहे.  तपास प्राथमिक पातळीवर असून घटनेस जबाबदार कोण आहे हे अद्याप निश्चित व्हायचे आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे.

कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांनी हा अर्ज केला होता. अर्जदार एकाच कंपनीचे भागीदार आहेत. त्यांचे दुसऱ्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. त्यांनी कामगारांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. दुर्घटनाग्रस्त लेबर कॅम्प हा ठेकेदाराच्यामार्फत उभारण्यात आला होता. संबंधित कॅम्प हा भिंतीपासून दहा फुटाच्या अंतरावर होता. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली असून अति पावसामुळे ती भिंत पडली आहे, असे समिती स्थापन करण्यासाठीच्या अहवालामध्ये नमूद आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहे. जबाबदारी निश्चित करण्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे, सुधीर शहा, नंदिनी देशपांडे,  नीलिमा वर्तक यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com