रब्बीच्या ५६ हजार हेक्टरवर पेरण्या; हरभऱ्याला सर्वाधिक पसंती

रब्बीच्या ५६ हजार हेक्टरवर पेरण्या; हरभऱ्याला सर्वाधिक पसंती
Published on: 

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या
५६ हजार हेक्टरवर पेरण्या

४६ हजार हेक्टरवर हरभराच; गहू, ज्वारी, मक्याचीही पेरणी सुरू

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला वेग आला असून गुरुवार (ता. १२) पर्यंत एकूण ५६ हजार ४९६.८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असून, तब्बल ४६ हजार २२८.१५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल गहू, ज्वारी आणि मका या पिकांची पेरणी झाली आहे.

कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २६ हजार ९३२.०८ हेक्टर आहे. त्यापैकी ४६ हजार २२८.१५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ४८५.५२ हेक्टर असून, आतापर्यंत ४ हजार ४२६.८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १२० हेक्टर असून, ३ हजार १५१.३० हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची १ हजार २७.२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय विचार करता, बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात १३ हजार ७४७.६० हेक्टर, मेहकरमध्ये ६ हजार २४६.८० हेक्टर, संग्रामपूरमध्ये ३ हजार ७१२ हेक्टर, शेगावमध्ये ३ हजार २१९.५० हेक्टर, सिंदखेडराजा येथे २ हजार ३४२.२० हेक्टर आणि खामगाव तालुक्यात २ हजार १२२.१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

देऊळगावराजा तालुक्यात २ हजार ५०.८० हेक्टर, लोणारमध्ये १ हजार ७७०.०५ हेक्टर, मलकापूरमध्ये १ हजार ६४९.७० हेक्टर, जळगाव जामोदमध्ये १ हजार २६९.६० हेक्टर, मोताळा येथे १ हजार २२२.८० हेक्टर, तर नांदुरा तालुक्यात ६९४.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

याशिवाय इतर कडधान्ये, तेलबिया आणि इतर पिकांचीही अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी पेरणीचा आकडा वाढत असला, तरी हरभरा आणि इतर पिकांच्या पेरणीसाठी पुढील काळात जमिनीतील ओलावा व उपलब्ध पाणी महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.