बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या विटंबने प्रकरणी फलटण येथे निषेध तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांना निवेदन
बुलडाण्यातील घटनेचा
फलटणमध्ये निषेध
राजाळे, ता. २३ : चिखला- काकड (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथे मंगळवारी (ता. १७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली असून, आज फलटण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये संबंधितांना अटक झाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना देण्यात आले आहे.
या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. विटंबना करणाऱ्या संशयितांना अटक झाली पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी माऊली सावंत, किरण भोसले, विक्रम शितोळे, धनंजय महामुलकर, राम सपकाळ, मच्छिंद्र भोसले, अक्षय तावरे यांच्यासह मराठा सेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
01019
फलटण : येथे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना निवेदन देताना सकल मराठा समाजातील कार्यकर्ते. (अमोल पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

