Bullet Silencer : कारवाया होऊनही बुलेटस्वारांचे उपद्वाप सुरुच! गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी

बुलेटच्या 'सायलेन्सर'मध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाजाने दिवसरात्र नागरिकांना त्रस्त करणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत आहे.
bullet silencer
bullet silencersakal
Updated on

कात्रज - बुलेटच्या 'सायलेन्सर'मध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाजाने दिवसरात्र नागरिकांना त्रस्त करणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत आहे. सोबतच, अशा गाड्यांच्या नंबरप्लेटवर गाडीचा क्रमांकही नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. पोलिसांकडून कारवाया होऊनही त्यांच्याकडून कात्रज आणि कोंढवा परिसरात उपद्वाप सुरुच आहेत. सध्या परीक्षांचा कालावधी असल्याचे पालक चिंताधीन आहेत.

रात्री साडेअकरा ते १२च्या दरम्यान राजीव गांधीनगर, सुखसागरनगर, अंबामाता मंदिरमार्गे प्रचंड मोठा आवाज करत बुलेट जातात, याचा नाहक त्रास होत असल्याचे नरेंद्र शिंदेकर यांनी सांगितले.

तर, याच भागात रात्रीचे रस्त्यावर वाढदिवस करणे, गाड्या सुसाट पळविणे, विचित्र सायलेन्सर वाजवणे वाढल्याचे पराग थोरात यांनी सांगितले. यशश्री फेज२ मध्येही दररोज सायंकाळी हे आवाज काढणारे टपोरी येतात, शिवशंभूनगरमध्येही असे महाभाग असल्याचे यशवंत हरिभक्त यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसह पालकांना त्रास होऊ नये म्हणून कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिसांकडून विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली होती. यावेळी बुलटेचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले होते.

मात्र, यामुळे कोणताही फरक पडलेला दिसून येत नाहीये. त्यामुळे नागरिकांतून पोलिसांचा वचक कमी झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी अशा लोकांवर थातूर-मातूर कारावाई न करता थेट गुन्हेच दाखल करण्याची मागणी होत आहे.

ज्या भागात सध्या या बुलेटस्वारांचा अधिक त्रास आहे. तेथिल सुखसागरनगर पोलिस चौकी होऊनही काही उपयोग नाही. तिथे कुठल्याही तक्रारी घेतल्या जात नाहीत. सायबर क्राईमचे काम तिथून चालत असल्याचे सांगितले जाते.

अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर ही चौकी सुरु झाली. पण, इथल्या रहिवाश्यांना काही उपयोग नाही त्यांना आजही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी जावे लागत असल्याचे स्थानिक नागरिक श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

कात्रज-कोंढवा परिसरातून आमच्याकडे सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहे. याबाबत कोंढवा आणि भारती पोलिसांनी कारवायाही केल्याचे आपण पाहिले आहे. येणाऱ्या काळातही त्या भागात स्वतंत्र ड्राईव्ह घेत या बुलेटधारकांचा बिमोड करण्याचे आमचे नियोजन आहे.

- अमोल झेंडे, उपायुक्त, वाहूतक पोलिस, पुणे

कात्रज परिसरातील सुखसागरनगरमधील प्रेरणा नर्सिंग होमच्या गल्लीत मी राहतो. याठिकाणी राज-रोजपणे दुचाकी गाड्या वेळी-अवेळी रात्री १२नंतरही बुलेट, यामाह गाड्या मोठ्याने आवाज करत जातात. फटाके फुटल्या सारखे आवाज करतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- सुभाष रायचूरकर, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com