esakal | 'बुलेट ट्रेन’चा प्रवास पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतून
sakal

बोलून बातमी शोधा

Red-Bullet-Train

'बुलेट ट्रेन’चा प्रवास पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतून

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर ता. २० : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ९० गावांमधून जाणार इंदापूर, बारामती तालुक्यामधून सर्व्हेक्षणास सुरुवात झाली आहे.

या बुलेट ट्रेनसाठी मुंबईपासून हैदराबादपर्यंत सुमारे ६५० किलोमीटर लांबीमध्ये १७.५ मीटर रुंदीची जागा भूसंपादन करण्यात येणार असून, ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण राज्यांना होणार आहे. बुलेट ट्रेन ही पुणे जिल्हातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातील ९० गावांमधून जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कुरवंडे- लोणावळ्यापासून बुलेट ट्रेनला सुरुवात होणार असून, इंदापूर तालुक्यातील चाकाटी हे शेवटचे गाव आहे. चाकाटीनंतर ट्रेन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.

सध्या बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये बुलेट ट्रेनच्या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरु असून, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्व्हेक्षणामध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमीन सर्व्हेक्षण सुरु आहे. ज्या शेतामधून बुलेट ट्रेन जाणार आहे, त्या क्षेत्राची माहिती घेण्याचे काम सुरु असून, बागायती, जिरायती क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण होणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा जाणून घेण्याचे काम देखील सुरु आहे. बुलेट ट्रेनचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो. तसेच, सामाजिक प्रभाव काय पडणार आहेत, याचेही सर्वेक्षण सुरु आहे. येत्या दोन महिन्यामध्ये सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत.

हेही वाचा: समाविष्ट २३ गावांच्या आराखड्यास मंजुरीची शक्यता

प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे असे होणार सर्व्हेक्षण

  • बुलेट ट्रेनच्या ट्रॅकमध्ये किती घरे जाणार?

  • घरातील कुटुंबाची सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे?

  • सध्या उपजीविकेची साधन काय आहे?

  • कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत. असून काय काम करीत आहेत.

  • बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्रभाव कुटुंबावर कशा प्रकार पडणार?

बुलेट ट्रेन जाणारी तालुकानिहाय गावे

मावळ- कुरवंडे, लोणावळा, कुसगाव बुद्रुक, डोंगरगाव, औंढे खुर्द, औंढोली, देवले, भाजे, मळवली, पाटण, कार्ला, शिलाटणे, बोरज, टाकवे खुर्द, मुंढावरे, वळक, वडिवळे, नाणे, खडकाळा, नायगाव, कान्हे, जांभूळ, सांगवी, आंबी, वराळे, नाणोलीतर्फे चाकण, इंदोरी, सुदवडी, सुदुंबरे.

खेड- खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, आळंदी, चऱ्होली, धानोरे.

हवेली- मोशी, धुळगाव, चऱ्होली बुद्रुक, चिखली, निरगुडी, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, रामोशीवाडी, आळंदी म्हातोबाची, तरडे, वळती, शिंदवणे.

पुरंदर- वाघापूर, आंबळे, टेकवडी, माळशिरस, राजुरी, पिसे.

दौंड- खोर, पडवी.

बारामती- वढाणे, दंडवाडी, नारोळी, कोळोली, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, साबळेवडी, जराडवाडी, गाडीखेल, कटफळ, सावळ, काटेवाडी.

इंदापूर- लाकडी, निंबोडी, सणसर, जाचकवस्ती, बेलवाडी, थोरातवाडी, कर्दनवाडी, परीटवाडी, कळंब, निमसाखर, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी.

loading image