esakal | बंदी असतानाही कात्रजवळ बैलगाडा शर्यत, 12 जणांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

bullock cart race

बंदी असतानाही कात्रजजवळ बैलगाडा शर्यत, 12 जणांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी असतानाही कायद्याचे उल्लंघन करीत बैलगाडा शर्यत भरवून पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 10 ते 12 जणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शनिवारी सकाळी 10 वाजता कात्रजवळच्या गुजरवाडी येथे घडला.

संतोष अशोक ननवरे ( वय 46, रा. गोकुळनगर, कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे (वय 29, रा. नेरावणे, वेल्हे), मयूर दिलीप शेवाळे ( वय 26, रा. देवाची उरुळी, शेवाळेवाडी), हरिश्चंद्र भागा फडके (वय 52), पद्माकर रामदास फडके (वय 37), पंढरी जगन फडके ( वय 55, तिघेही रा. विहीगर, नेरे, पनवेल), ऋषिकेश चंद्रकांत कांचन (वय 23, रा. उरुळी कांचन), संकेत शशिकांत चोरगे(वय 21), यश राजु भिंगारे (वय 19), संतोष शिवराम कुडले (वय 41, तिघेही रा. भेलकेवाडी, भोर) व राहुल प्रकाश चौधरी (वय 34, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: मुंबईत पावसाची काळरात्र; पाहा मन विचलीत करणारी छायाचित्रे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कायद्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी आहे, असे सतानाही कायद्याचे उल्लंघन करीत कात्रज जवळच्या गुजरवाडी येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या सपाट मैदानामध्ये शनिवारी सकाळी साडे नउ ते साडे दहा वाजता पंढरी फडकेसह एका व्यक्तिने बैलगाडा शर्यत भरविली होती. तेथे बैलांना गाड्याना जोडून, निर्दयपणे मारहाण करुन, त्यांची शेपटी पिरगलून, जबरदस्तीने पळवित त्यांना निर्दयपणे वागविले. या प्रकाराबाबत फिर्यादीने आयोजकांसह इतरांना सांगितले. मात्र त्यांनी फिर्यादीशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शर्यतीत एक बैल व एक छकडा पळवून लावला. कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन केला. याप्रकरणी 10 ते 12 जणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image