दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

दौंड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
Published on

वरवंड, ता. ३ : दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत वरवंड, कुसेगाव, बोरीभडक भागात चोरट्यांनी मोठा हातसाफ करून पोलिसांना अक्षरशः आव्हान दिले. चोरट्यांनी वरवंड येथे इंडीयावन या नामांकीत कंपनीची रक्कमेसह एटीम, बोरीभडक हद्दीत पिकअप वाहन तसेच कुसेगाव येथील एका घरात सोन्याच्या दागिन्यांची अशी एकूण १३ लाख ५८ हजार ३०० रुपयांची चोरी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्य़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तपासासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस व निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मध्यरात्री दीडच्या सुमारास यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गावात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.चोरटयांनी बोरभडक येथील ज्योतिराम जाधव यांचे तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे चारचाकी पिकअप वाहनच शिताफीने चोरुन पोबारा केला.त्यानंतर चोरटयांनी वरवंड येथे रात्री अंदाजे दोन वाजता हजेरी लावली.यावेळी भरचौकात पुणे सोलापुर महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत असणाऱया इंडीयावन एटीमकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला आजूबाजूच्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेरांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर चोरटयांनी हातातील वेगवेगळ्या साहित्यांनी एटीमच शिताफीने काढले. पिकअप वाहनात ते मशीन ठेवून पलायन केले. यावेळी एका सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. गावात काही जणांच्या घरासमोरील दुचाकी चोरीला गेल्या. त्या दुचाकी काही किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला पडल्याच्या आढळून आल्या. दरम्यान, चोरट्यांनी एटीमसह एकूण ७ लाख ८३ हजार ३०० रुपयांची रक्कम चोरी केल्याचे समोर आले. काही अंतरावर व्हिक्टोरिया तलाव परिसरात देखील चोरट्यांनी एका घरात चोरीचा प्रयत्न केला. मात्र, घरातील व्यक्तींनी प्रसंगावधान राखल्याने तेथील चोरीचा डाव फसला. कुसेगाव येथे एका घरात डल्ला मारला. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण २ लाख ७५ हजारांची चोरी केली. दरम्यान, चोरीची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक महेश माने, पाटस पोलिस चौकीचे फौजदार बाळकृष्ण गाडेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, फाॅरेन्सिक पथक (गुन्हे शास्त्रीय तपासणी) आदी पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com