Pune Theft : पर्वती पायथ्याजवळील सदनिकेतून पाच लाखांचे दागिने चोरी
Parvati Crime : पर्वती पायथ्यावरील मित्रमंडळ कॉलनीत एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले असून, पर्वती तपास करत आहेत.
CCTV Footage Under Review After Major Theft in Pune Residential AreaSakal
पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत नितीश मेहता (वय ३५, रा. अनंत बिल्डिंग, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.