मुर्टीत बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

मुर्टीत बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास
Published on: 

वडगाव निंबाळकर, ता. २९ : मुर्टी (ता. बारामती) येथे बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी ५१ हजार ३०० रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वॉशिंग मशिन, एलईडी दूरचित्रवाणी संच, इलेक्ट्रिक शेगडी, तांब्याची भांडी आणि बेडशीटसह विविध वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी बाळू बाबा शिंदे (सध्या रा. ओम शक्ती, वाळजी लढ्ढा रोड, मुंबई) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिंदे हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास असून, मुर्टी येथे त्यांचा बंगला आहे. सण, उत्सव आणि यात्रेच्या निमित्ताने ते गावी येत असतात. त्यांच्या बंगल्याची देखभाल नंदाबाई पोपट भंडलकर या करतात. २२ ऑक्टोबर रोजी भंडलकर यांना बंगल्याचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नातेवाईक सोमनाथ महादेव सोनवलकर यांना माहिती दिली. सोनवलकर यांनी शिंदे यांना घटनेची माहिती कळवली. चोरट्यांनी मागील खिडकीचे गज कापून तसेच दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले. बेडरूम, हॉल आणि स्वयंपाकघरातील साहित्य चोरीला गेल्याचे आढळले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.